सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्यांना सहकारी बँकेचा लाभ मिळवून देणार....

निघोज : निघोज सोसायटी माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शासकीय व सहकारी बॅंकेचा लाभ मिळवून देण्यासाठी पदाधिकारी व संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याची ग्वाही संस्थचे चेअरमन सुनिल वराळ यांनी दिली आहे. 


निघोज सोसायटीची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी ते सभेच्या अध्यक्षस्थानावरुण बोलत होते. यावेळी सभेच्या प्रारंभी मंळगंगा माता, संस्थचे संस्थापक किसनराव वराळ पाटील,गबाजी लंके पाटील,गबाजी ढवळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. 

यावेळी मंळगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकरशेठ कवाद, कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके, जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी आर के वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, माजी उपसभापती खंडू भुकन, सामाजिक कार्यकर्त्या कांता लंके,माजी चेअरमन बाळासाहेब लामखडे,निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात , मंळगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास लंके, निघोज सोसायटीचे माजी उपाध्यक्ष अनंतराव वरखडे, शांताराम कळसकर, सोमनाथ वरखडे, युवा नेते रुपेश ढवण, बबनराव तनपुरे, रोहिदास लामखडे, सोसायटीचे उपाध्यक्ष वसंतराव ढवण, संचालक शिवाजीराव लंके, शांताराम कवाद, दत्तात्रय लंके,असिमभाई हावालदार शांताराम लाळगे, रामदास रसाळ, संतोष लामखडे, हिराभाउ सोनवणे, संचालिका मनिषा वराळ,मंदा ढवळे आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


यावेळी संस्थेचे सचिव रामदास भोसले यांनी अहवाल वाचन केले. विषय पत्रीकेचे वाचन केले. सोमनाथ वरखडे व शांताराम कळसकर यांनी सर्व विषय मंजूर करण्याचा ठराव मांडला मात्र जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी आर के वराळ पाटील यांनी सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करुन विषय मंजुर करण्यात यावे अशी मागणी केली. 

वराळ यांनी प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा करीत आपले मत मांडले. विषय मंजुरीचा ठराव निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांनी मांडला सर्व विषय सभासदांनी टाळ्या वाजवून मंजूर केला. शेतकऱ्यांची कुकडी डावा कालव्याची पाणीपट्टी सोसायटीने भरावी या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.

मात्र यामध्ये सोसायटीने पाणीपट्टी भरावी यासाठी बहुसंख्य सभासदांनी विरोध केला. पाणीपट्टी सोसायटीने भरु नये अशी जोरदार मागणी उपसरपंच माऊली वरखडे यांनी करीत हा ठराव नामंजूर करण्यात यावा अशी मागणी केली. निघोज सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब लामखडे यांनी आपण सात वर्षे चेअरमन म्हणून काम करताना एक रुपयाचा चहापाणी अपेक्षा न करता काम केले. सभासदांना लाभांश वाटप केले.

मात्र तथाकथित सामाजिक कार्यकर्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यावर लाभांश वाटप चुकीचे केल्याचा आरोप करुन आपल्याला लक्ष करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आपण दोषी आहोत का अशी विचारणा सभासदांना केली.तीस ते पस्तीस वर्षे दूध डेअरी चालवून ज्यांनी दूध संस्थेचा पैसा स्वत.साठी वापरून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला त्यांचीच चौकशी करण्याची मागणी लामखडे यांनी केली. 

दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके यांनी प्रतिनिधी माध्यमातून सोसायटी नंबर दोनला परवानगी देण्याची मागणी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.मात्र आमदार लंके यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी या ठरावाला विरोध करीत दुसऱ्या सोसायटीसाठी परवानगी नाकारण्यात आली. 

यामध्ये दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष लंके हे आमदार निलेश लंके यांचे समर्थक आहेत.तसेच दूसऱ्या सोसायटीला परवानगीला विरोध करणारे हे सुद्धा आमदार समर्थक कार्यकर्ते आहेत अशाप्रकारे लंके समर्थकांमध्ये दुही असल्याची चर्चा होत होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेचे सुत्रसंचालन सचिव रामदास भोसले यांनी केले शेवटी संचालक शांताराम कवाद यांनी आभार मानले.

सोसायटी सभासद संख्या ४ हजार ७०९ , वसूल भागभांडवल २ कोटी ६४ लाख , तरतूद व निधी १ कोटी ६६ लाख, गुंतवणूक ९७ लाख, कर्जवाटप ११ कोटी ३० लाख, बॅंकिंग पातळीवर १०० टक्के वसुली, एकूण नफा ४७ लाख,

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post