झावरेंसह माजी सरपंच भालेकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पारनेर : तालुक्यातील वासुंदे येथील गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा. ठ. झावरे यांच्यासह माजी उपसरपंच महादू भालेकर व सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष भिमाजी गायके गजानन झावरे यांच्यासह वासुंदे गावातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.


दिवंगत आमदार वसंतराव झावरे यांचे समर्थक व वाटचालीचे साक्षीदार असणारे व खांद्याला खांदा लावून काम करणारे अनेक दिग्गजांनी संसदपटू सुप्रियाताई सुळे व महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी सुपात जाहीर प्रवेश केला आहे.

स्थानिक नेतृत्वाला कंटाळून या पदाधिकारांनी प्रवेश केला असून वासुंदे गावच्या सुजित झावरे गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे व महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत गुरूदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा. ठ. झावरे, माजी सरपंच माऊली पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादु भालेकर, सेवा संस्थेचे माजी चेअरमन भिमाजी गायके, भागुजी दादा झावरे, गजानन शेठ झावरे, उपाध्यक्ष रा. बा. झावरे, गजानन झावरे, ग्रामपंचायत सदस्य सुदाम शिर्के, स्वप्निल झावरे, संचालक रावसाहेब बर्वे, मनोहर झावरे, सिताराम जगदाळे, प्रगतशील शेतकरी निवृत्ती झावरे यांनी प्रवेश केला आहे. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे उपस्थित होते.

गेल्या दोन पिढ्यांपासून ज्यांना आम्ही मदत केली त्यांच्या कडून अपमान व कायमच उपेक्षा‌ होत असल्याने आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बा. ठ. झावरे व माजी उपसरपंच महादू भालेकर यांनी सांगितले. स्व.आमदार वसंतराव झावरे यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी पक्षात प्रवेश केला असल्याचे माजी उपसरपंच महादु भालेकर म्हणाले.

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या पदाधिकारांचा सत्कार करत भविष्यात पक्षात संधी दिली जाईल असे आश्वासन दिले आहे.

आमदार निलेश लंके तालुक्यातील वासुंदे येथील गुरूदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी अध्यक्ष बा. ठ. झावरे सारखा मनमोकळ्या माणसांची पक्षाला व मला गरज आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या खांद्यावर डोके टेकविले आहे. आता चिंता सोडा.. 

आम्ही लोकांसारखे गळे आवळणारे‌ नसुन जीवाला जीव देणारे व लावणारी माणसे‌ आहोत. त्यामुळे वासुंदे गावाप्रती व माणसांप्रती वेगळी आस्था असुन त्यांच्या अनुभवाचा व कार्याचा मला फायदा होईल असे आमदार निलेश लंके म्हणाले. तर दुसरीकडे वासुंदे गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post