खाद्यतेल स्वस्त....

नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण होऊ शकते. स्वदेशी तेलबिया मोठ्या प्रमाणात बाजारात आल्या आहेत. त्यामुळे मागील महिन्यापर्यंत उच्चांकावर गेलेले खाद्यतेलाचे दर येत्या काळात कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे.


भारत हा जगातील सर्वांत मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे. देशाच्या एकूण आयातीपैकी ६५ टक्के आयात पामतेलाची असते. हे पामतेल तयार किंवा कच्च्या स्वरूपात आयात केले जाते. भारतात पामतेलापाठोपाठ सूर्यफूल तेलाची आवक होते.

यातील ६० टक्के युक्रेनहून, तर ४० टक्के तेल रशियाहून आयात केले जाते. युद्धानंतर आता रशियाहून आयात हळूहळू सुरळीत होत आहे, अशी सर्व स्थिती असताना सध्या स्वदेशी खाद्यतेल स्थितीदेखील सुधारत आहे.

तेल स्वस्त होणार असल्याने दिवाळीत घराघरात चांगले पदार्थ तळले जाणार आहेत. गोरगरिबांचे दिवाळी काही अंशी गोड होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post