राहुरी : राहुरी फॅक्टरी येथील चित्रकार आसिफ शरीफ शेख आणि वांबोरी येथील शिल्पकार योगेश देविदास लोखंडे या दोन्ही कलावंतांचे सामूहिक चित्र व शिल्प प्रदर्शन मुंबई येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळीमध्ये 20 ते 26 सप्टेंबर या कालावधीत कला रसिकांना पहाण्यासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 7 ह्या वेळे दरम्यान विनामूल्य बघण्यासाठी खुले राहणार आहे.
दोन चित्रकार व दोन शिल्पकार असे चार कलाकार एकत्रित येऊन '' FOUR '' या शिर्षकावर आधारित हे कला प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात आसिफ शरीफ शेख या चित्रकाराने निसर्गाच्या सहवासाने होणारे मनावर होणारे परिणाम व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संवेदना या चित्राच्या माध्यमातून रंग, रेषा, आकार, पोत या माध्यमातून कॅनव्हासवर ऍक्रेलिक या माध्यमात रंगवलेल्या आहेत.
चित्र काढता, काढता त्यातुन मिळणारा जगण्यातील आनंद आणि चित्रा प्रति एकरूपता हेच " कलर्स ऑफ लाईफ '' या संकल्पने खाली चित्रकार आसिफ शेख विशिष्ट शैलीमध्ये चित्र निर्मिती करत आहेत. आसिफ यांची अनेक चित्रांना देशा, परदेशातील लोकांच्या संग्रहात आहेत.
त्याच प्रमाणे वांबोरी येथील शिल्पकार योगेश लोखंडे यांनी त्यांचे शिल्पकलेचे शिक्षण जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबईमधून केलेले आहे. ह्या कलाप्रदर्शनामध्ये योगेश लोखंडे यांनी '' युगधंर '' या संकल्पनेवर आधारित कृष्णाच्या आकाराला घेऊन शिल्प निर्मिती केली आहे.
शिल्पाचे माध्यम फायबर ग्लास आहे. योगेशच्या मते युगानूयुगे सृष्टी वर गोंधळलेल्यांना मार्ग दखवणारे मार्गदर्शक जन्मास येतात. हे युगपूरूष, अवतार घेऊन लोककल्याणा करीता कार्य करतात, सृष्टी चे संवर्धन करतात, म्हणून ते युगधंर होतात .
सदर प्रदर्शनात युगधंर या संकल्पने वरती सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग यांचे शिल्प तयार करुन, त्या माध्यमातून या शिल्पाकृती साकार केल्या आहेत. या शिल्पांच्या हातात बनवलेले बीजफल हे अंतीम सत्य आहे, जे की युगानुयुगे निर्मिती चे कार्य करत आहेत व निर्मिती ची प्रक्रिया अवीरत पणे चालू ठेवत आहेत.
या युगधंर संकल्पनेवर आधारीत शिल्पाकृती शिल्पकार योगेश लोखंडे यांनी साकार केल्या आहेत. योगेश यांच्या शिल्पांना देशा, परदेशामध्ये प्रचंड मागणी आहे, योगेशच्या अनेक शिल्पांना देश, वीदेशातील लोकांच्या संग्रहात आहेत.
Post a Comment