नगर : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ घुलेवाडी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याला मारहाण केल्याच्या घटनेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात महिलांनी त्या माजी सदस्यांना मारहाण केली असून त्याचा व्हीडीओ तयार करण्यात आलेला आहे. तो व्हीडीओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. चूक कोणाची आहे हे शोधून त्यावर मार्गदर्शन करणे गरजेचे असताना अशा प्रकरची मारहाण करून समाजात व्हीडीओ व्हायरल करणे चुकीचे आहे, असे मत समाज माध्यमावर व्यक्त होत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेचे निषेध ग्रामस्थांनी केलेला आहे.
Post a Comment