रोहकले यांनी नातेवाईकांना उमेदवारी दिलीय....

राहाता : रावसाहेब रोहोकले यांनी जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारीचे गाजर दाखवून झुलवत ठेवले. जन समाजातील उमेदवारांना नाकारून आपल्या नातेवाईकांनाच उमेदवारी देण्याची भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन विनोद तोरणे यांनी केले.


महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नेते श्री विनोद तोरणे यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह श्री बापूसाहेब तांबे यांच्या गुरुमाऊली मंडळ जाहीर प्रवेश केला. श्री

विनोद तोरणे यांनी बाजीराव बनसोडे, चंद्रकांत त्रिभुवन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसह गुरुमाऊली मंडळ 2015 मध्ये प्रवेश केला. याप्रसंगी गुरुमाऊली मंडळाचे सर्वेसर्वा, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप. सलीम खान पठाण, माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब खरात, उच्च अधिकार समितीचे कार्याध्यक्ष मारुती गायकवाड, श्री जयेश गायकवाड,राहता तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील गायकवाड, विठ्ठल काळे, उमेदवार योगेश वाघमारे, बाळासाहेब गमे, बाबासाहेब दिघे, राहुरी तालुका शिक्षक संघाचे सरचिटणीस शिवाजी वाघ, अशोक गुरव, वाल्मीक गमे, शरद गमे, दिलीप साळी, प्रवीण पटेकर, शिवाजी दरेकर सर, राहुल पुरी, विश्वास उबाळे, संदीप धीवर आदिसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

तोरणे म्हणाले की, शिक्षक बँकेत आपल्या नातेवाईकांसाठी रोहोकले काम करतात. ते आता सेवानिवृत्त झाले आहे. साडेतीन वर्ष चेअरमन पद भोगून, सत्तेची लालसा न भागल्यामुळे पद टिकवण्यासाठी न्यायालयात जाऊन लढाई लढण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांनी केला. सत्ता फक्त स्वतः व नातेवाईकांसाठीच हवी आहे. 

हे जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकांनी कधीच ओळखले आहे. आम्ही शिक्षक परिषद प्रणित गुरुमाऊली मंडळातून बाहेर पडून बहुजन समाजाला न्याय देणारे, सर्व जाती धर्मांना सामावून घेणारे श्री बापूसाहेब तांबे यांचे नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळ जाहीर प्रवेश करत आहोत, असे ते म्हणाले.

रावसाहेब रोहोकले यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सेवानिवृत्त झालेले व शिक्षक बँकेचे सभासदही नसलेले रोहोकले हे ढोंगी व लबाड आहेत. स्वतःचा व नातेवाईकांचा स्वार्थ साधण्यासाठी कार्यकर्त्यांना फक्त वापरून घेतात. 

त्यानंतर वाऱ्यावर सोडून देतात; याचा अनुभव माझ्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना आला आहे. ही प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या भवितव्याशी खेळणारी संधीसाधू प्रवृत्ती आम्हाला मुळीच मान्य नाही. याउलट बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक बँकेचे आदर्श व उत्कृष्ट कामकाज चालू आहे, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post