एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट...

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे.


शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. तेव्हापासून एकनाथ शिंदे हे चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला मोठा धोका आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

महिनाभरापूर्वीच मुख्य्मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता त्यानंतर गुप्तचर विभागानेच याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post