पारनेर : शिक्षक बँकेच्या निवडणुकीत प्रचाराची पातळी अत्यंत खालावली असून काही मंडळे खोके देऊन ओके झाल्याचा भास निर्माण करण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेचे नेते संतोष खामकर यांनी केला आहे.
ज्यांना शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेचा कोरम पुर्ण करता आला नाही अशांनी सत्तेची स्वप्न पाहू नयेत असा जोरदार टोला खामकर यांनी विरोधकांना लगावला. रावसाहेब रोहोकले यांचे कार्यकाळात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसून सभासद सुज्ञ आहेत.
कुणी गद्दारी केली.कुणी कुणाला खोके देऊन ओके केले.याची निश्चित जाण सभासदांना आहे.त्यामुळे सभासदांमध्ये रोहोकलेगुरुजी प्रणित गुरूमाऊली मंडळाविषयी सुप्त लाट असून रोहोकलेप्रणित गुरूमाऊली मंडळ विक्रमी मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास खामकर यांनी व्यक्त केला आहे.
गुरूमाऊली मंडळ चोरले. परंतु रोहोकले गुरूजींचा विचार मात्र चोरता येणार नाहीत कारण गुरूजींच्या विचारावर चालण्याची तुमची पात्रताही नाही.बँकेची भक्कम आर्थिक पायाभऱणी रोहोकले गुरूजींनी केली. त्यामुळे बँकेची नफाशक्ती वाढली. काही खुज्या विचारांची मंडळी गुरूजींवर पातळी सोडून आरोप करत आहेत.
त्यामुळे हि विचारांची लढाई विचाराने लढण्याचे भान हि मंडळी विसरली आहेत. विरोधकांना पराभव समोर दिसत असल्यामुळे ताळतंत्र सोडून प्रचार केला जात आहे.परतु सभासद ह्यांच्या भूलथापांना भुलनार नसल्याचे खामकर यांनी सांगितले.
शिक्षक बँकेचे उमेदवार प्रवीण ठुबे यांचे संघटनात्मक काम व रोहोकलेगुरूजीं विषयी तालुक्यात असलेली विश्वासार्हता या जोरावर पारनेर तालुक्यातून रोहोकलेप्रणित गुरूमाऊली मंडळ पाचशे मताचा आकडा पार करेल असा ठाम विश्वास संतोष खामकर यांनी व्यक्त केला.
तालुक्यात प्रचार करताना सभासदांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून पारनेर तालुक्यातील सभासद यावेळी इतिहास घडवणार असल्याचा विश्वास खामकर यांनी व्यक्त केला.

Post a Comment