शेवगाव : खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा सदरी नावाची नोंद करण्यासाठी 18 हजाराची लाचेची मागणी केल्या प्रकरणी शेवगाव तलाठी कार्यालयातील संगणक ऑपरेटरसह खासगी व्यक्तीस लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये संगणक ऑपरेटर विजय धनवटे व आरिफ पठाणे असे खासगी व्यक्तीचे नाव आहे. तक्रारदार यांनी शेवगाव तालुक्यातील माळीवाडा परिसरात गट 151 मध्ये 2 गुंठे जागोची खरेदी केली होती.
या जमिनीच्या सातबारा उतार्यात नाव लावण्यासाठी संबंधीत दोघांनी चार ऑक्टोबरला त्यांच्याकडे 20 हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम आठरा हजार ठरली होती. तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात येऊन या लाच मागणीवरून दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Post a Comment