पाटलांची तातडीने बदली...

नगर ः जिल्ह्यात दोन पोलिस कर्मचार्यांच्या आत्महत्या प्रकरणाने जिल्हा हादरून गेलेला आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली होईल, असे वाटत होते. तशी चर्चा सुरु होती. त्यात आज बदलीचा आदेश निघाला आहे.


अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर येथून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राकेश ओला यांची नियुक्ती झाली आहे. तसा अध्यादेश शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी दिले आहे.

पोलिस अधिक्षक दर्जाच्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्याची प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये  राज्यातील 24 अधिकार्‍यांच्या बदल्या झालेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली होणार असल्याची चर्चा सुरु होती. 

पोलिस कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव व बेलवंडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सुनिल मोरे या दोन आत्महत्या प्रकरणामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यावर अनेक आरोप झालेले होते. या प्रकरणी त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी ही आत्महत्याग्रस्त पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनी केली होती. 

तसेच मनोज पाटील यांचा वचक कमी झाला असल्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी होत होती. या बाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना थेट निवेदनही पाठवण्यात आली होती. या बदल्याच्या प्रक्रियेत मनोज पाटील यांची बदली करण्यात आलेली आहे. 

त्यांच्या जागी नागपूरवरून  राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरवरुन ओला हे येत असल्यामुळे उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच त्यांची नियुक्ती झाल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरु आहे.

ओला आल्यानंतर जिल्ह्यातील बेशिस्त झालेल्या व्यवस्थेला शिस्त लागेल, अशी आशा सर्वांना लागली आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post