अमर छतीसे
श्रीगोंदा : नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यासह श्रीगोंदा तालुक्यातील शेतीचे सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे.
या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले .
श्रीगोंदा तालुकसह नगर जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकर्याच्या डोळ्यात पाणी आहे त्यामुळे सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तलाठी व कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे.
पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तालुक्यातील सर्वजण एकवटले आहेत. ही समाधानाची बाब आहे .

Post a Comment