श्रीगोंदा तालुका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन...


अमर छत्तीसे

श्रीगोंदा : तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज विविध मागण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन केले. 

या निवेदनात सुधारित वेतनाप्रमाणे उर्वरित वेतन दिले पाहिजे. दिवाळी निमित्त बोनस व सानुग्रह व गणवेश मिळावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सेवा  पुस्तक अद्यावत पाहिजे. ग्रामपंचायत सफाई कामगार व पाणी पुरवठा कामगारांना लागणारे आवश्यक साहित्य देत नाही.


ते तात्काळ देण्यात यावे आदी मागण्यासाठी आज कर्मचारी संघटनेने पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले या आंदोलनात संघटनेचे नेते सुधीर टोकेकर, तालुकाध्यक्ष अनिल शिंदे ,बाळासाहेब आल्हाट ,सुनील पाचपुते. कल्याण दरवडे दरेकर.नवनाथ थोरात सिद्धार्थ रोकडे संजय जाधव छबू आरडे संतोष लगड सुनिल कदम सागर शिंदे गणेश शिंदे व संघटनेचे  पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post