जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींची प्रारुप मतदार यादी जाहीर ...

नगर ः जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ दरम्यान पूर्ण होत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनानुसार गुरूवारी (ता. १३) प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. १८ पर्यंत हरकती आवणि सूचना दाखल करण्यास मुदत आहे, अशी माहिती महसूल उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली.


जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. संगमनेर ३८, नगर २८, कोपरगाव २६, पारनेर १६, नेवासा १३, शेवगाव १२, राहाता १२, पाथर्डी ११, राहुरी ११, श्रीगोंदा १०, अकोले १०, कर्जत ८, श्रीरामपूर ६, जामखेड ३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 

सार्वत्रिक निवडणुकीसाठी आवश्यक असणारी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. मतदार यादी तयार करण्यासाठी ३१ मे २०२२ ला अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरली आहे. २०५ ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी १३ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. ग्रामपंचायत, तलाठी, मंडलाधिकारी, पंचायत समिती व तहसील कार्यालयांच्या फलकावर ही यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ता. १३ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत या प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. उपलब्ध होणाऱ्या हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी २१ ऑक्टोबरला होणार आहे.

जिल्ह्यातील महत्वाच्या ग्रामपंचायतीची तालुकानिहाय यादी : अकोले : भंडारदरा, चास, नेवासा : माका, खुपटी, भेंडा खुर्द, वडाळा बहिरोबा, कांगोणी, जामखेड : राजुरी, रत्नपूर, नगर : कापूरवाडी, वाळकी, नेप्ती, नांदगाव, राहाता : साकुरी, सावळी विहिर बुद्रूक, नांदुर्खी, पारनेर : भाळवणी, ढवळपुरी, पळशी, गोरेगाव, राहुरी : सोनगाव, कोल्हार खुर्द, श्रीगोंदा : काष्टी, बनपिंप्री, बेलवंडी, श्रीरामपूर : कमालपूर, खंडाळा, शेवगाव : दहिगाव ने, अमरापूर, पाथर्डी : तिसगाव, भालगाव, कोल्हार. संगमनेर : जोर्वे, साकूर, तळेगाव दिघे, धांदरफळ खुर्द व बुद्रूक, कर्जत : कोपर्डी, कोपरगाव : माहेगाव देशमुख, रांजणगाव देशमुख, चांदेकसारे, चासनळी.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post