श्रीगोंद्याच्या पूर्व भागात मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान

 अमर छत्तीसे

श्रीगोंदा : सध्या पावसाने सगळीकडेच धुमाकुळ घातला आहे त्यात पुर्व भागातील आढळगाव, भावडी, कोकणगाव, हिरडगाव, तांदळी या वडगाव या भागात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे या भागातील सरसकट पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी भाजपच्या आढळगाव गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या पंचशीला  गिरमकर यांनी केली आहे. 


याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसाने शेतातील बाजरी, उडीद, मका, कपाशी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या पंचनामे सुरू आहेत.

पण हे पंचनामे सरसकट करण्यात यावेत कारण सर्वच शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उडीद काढून शेतात पावसाने भिजल्यामुळे नुकसान झाले आहे. सध्या गहू, हरभरा पेरणीचे दिवस आहेत. या पावसाने शेतात तळेच साचले आहेत. 

त्यामुळे शेतीची मशागत ही करता येईना म्हणून शेतकरी सर्व बाजूंनी अडचणीत सापडला आहे. म्हणून झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात माजी जिल्हा परिषद सदस्या गिरमकर यांनी केली आहे.


या पावसाने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे तात्काळ सर्व पंचनामे सरसकट करून दिवाळी अगोदर शेतकर्यांना मदत मिळाली पाहिजे यासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असल्याचे गिरमकर यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post