अमर छत्तीसे
नगर : जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. आगामी काळात पक्षाकडून आपल्याला पाहिजे तेव्हढी साथ मिळत नाही. त्यामुळे त्या माजी आमदारांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळेल, अशी आशा त्या माजी आमदारांना होती. त्यांनी तशी चर्चाही घडवून आणली होती. मात्र त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी आता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. आगामी काळात विधान परिषदेची किंवा लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी चर्चा झाल्याची भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत चर्चा सुरु आहे. त्यामुळे ते माजी आमदार राष्ट्रवादीत कधी दाखल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राधाकृष्ण विखे यांना मंत्रीपद पक्षाने दिल्यापासून भाजपातील एक गट नाराज आहे. याबाबत आता काहीजण बोलण्यापेक्षा पक्ष सोडून देण्याच्या विचारात आहेत.

Post a Comment