निघोज : पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासकामांना मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे. अळकुटी - निघोज जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असल्याचे प्रतिपादन संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी व्यक्त केले आहे.
पारनेर तालुक्यातील निघोज परिसरातील पांढरकरवाडी येथे जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप पाटील वराळ यांच्या माध्यमातून शाळा खोलीचे लोकार्पण संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात वराळ पाटील बोलत होते. यावेळी उपसरपंच माऊली वरखडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे श्री मळगंगा विकास ट्रस्टचे विश्वस्त बजरंग वराळ, ग्राम विकास अधिकारी दत्तात्रय वाळके, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लम भाई इनामदार , ठेकेदार निलेश घोडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश वाव्हळ , ग्रामपंचायत सदस्या ज्योती पांढरकर, सोसायटीच्या संचालिका मनीषा वराळ, ठेकेदार मनोज लामखडे, अंगणवाडी सेविका सोनवणे , युवा नेते महेंद्र पांढरकर ,महेश पांढरकर, सुकदेव पांढरकर,राहुल पांढरकर, अंकुश गारुडकर, दशरथ पांढरकर, भाऊसाहेब पांढरकर,वसंत पांढरकर, गोकुळ पांढरकर, सिद्धेश पांढरकर, राहुल गारुडकर, संदिप गारुडकर ,यमुना पांढरकर, मिना पांढरकर, मनिषा पांढरकर,चैताली पांढरकर स्वाती पांढरकर, साळुंके सर, गुंड सर, वत्सलाबाई पांढरकर आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वराळ पाटील यावेळी म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी गेली पाच वर्षात मोठ्या प्रमाणात मदत करीत आम्हाला विकासाभिमुख पाठबळ दिले असून शिंदे - फडणवीस सरकारमध्ये नामदार विखे पाटील यांना मानाचे पद मिळाले आहे.
तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळाल्याने जिल्हा विकासाबाबत आघाडीवर राहणार असुन आपल्या पारनेर तालुक्यात सर्वाधिक विकासकामे होणार असून याबाबत आळकुटी - निघोज जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागणार असल्याची ग्वाही वराळ पाटील यांनी दिली आहे.
पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर यावेळी म्हणाले जिल्हा परिषद पंचायत समिती यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागली असून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकासकामे होण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामांचा पाठपुरावा केल्याने पाच वर्षात जवळपास पंचवीस ते तीस कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून खर्च करण्यात आला आहे.
आरोग्य,ग्रामअभियान ग्रामस्वच्छता, विज,रस्ते जलसिंचन योजना, शाळा आदी योजनांवर सर्वाधिक खर्च करण्यात येउन ग्रामीण भागातील लोकांना सर्वाधिक विकासकामे माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या उमेदवारीवर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिक्कामोर्तब केला असून तालुक्यातील सर्वाधिक जिल्हा परिषद व पंचायत समिती जागांवर नामदार विखे पाटील यांच्या विचारांचे उमेदवार निवडून येतील अशी ग्वाही बाबर यांनी दिली आहे.


Post a Comment