नेवासा : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक व विकास मंडळाच्या निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील उर्दू शिक्षकांचा प्रचंड पाठिंबा गुरुकुल स्वराज्य युतीला मिळत असून त्यामुळे गुरुकुल स्वराज्य मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा ठाम विश्वास उर्दू शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष इमाम भाई सय्यद यांनी व्यक्त केले.
प्रचारादरम्यान नेवासा तालुक्यातील उर्दू बांधवांशी त्यांनी संवाद साधला, सत्ताधारी मंडळांकडून सातत्याने सर्वसामान्य सभासदांच्या तोंडाला पानेच पुसली गेली असून, दोन्हीही गुरुमाऊलींकडून सभासदांचा भ्रमनिरास झालेला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की प्रचारानिमित्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यात उर्दू बांधवांशी संपर्क केला असता 80 टक्के उर्दू शिक्षक गुरुकुल व स्वराज्य मंडळा सोबत आहेत ,असा दावाही त्यांनी केला. गुरुकुल व स्वराज्य मंडळाचा जाहीरनामा सर्वसामान्य सभासदांमध्ये विश्वास पात्र ठरत आहे.
राज्याचे नेतृत्व डॉ. संजय कळमकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेवून स्वराज्य व गुरुकुल युतीला भरघोस मतदान करावे असे आव्हान त्यांनी केले. यावेळी उस्मान भाई तांबोळी, मतीन मनियार, हरून कुरेशी ,जावेद शेख, फैयाज सर, शेर बानू सय्यद मॅडम, परवीन इनामदार मॅडम , विकास मंडळ नेवासा सर्वसाधारण मतदारसंघाचे उमेदवार भास्कर नरसाळे, ज्येष्ठ नेते अशोक मोरे, यशवंत गवळी, राजाभाऊ नरवडे, सलीम भाई शेख, राहुल कदम, नवनाथ वनवे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉक्टर संजय कळमकर यांच्या नेतृत्वाखालील गुरुकुल व स्वराज्य आघाडी युतीवर सर्वसामान्यांचा विश्वास असल्याने विजय निश्चित आहे. - उस्मान भाई तांबोळी, गुरुकुल नेते



Post a Comment