कुंड माउली नवरात्र उत्सव व मंळगंगा माता सार्वजनिक नवरात्रोत्सव माध्यमातून कुंड परिसर व गावांमधील कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद

निघोज : कुंड माउली नवरात्र उत्सव व मंळगंगा माता सार्वजनिक नवरात्रौत्सव माध्यमातून कुंड परिसर व गावांमधील कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत असून जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील कुंडमाउली मंळगंगा मंदीर परिसरात नवरात्र उत्सव निमित्ताने रंजनाताई महाराज वराळ,पवन महाराज तनपुरे, नंदकुमार महाराज वराळ, श्रीहरी महाराज पवार, सुभाष महाराज मगर, रामदास महाराज वराळ, तुषार महाराज गुंड, संतोष महाराज बढेकर, यांचे प्रवचन तसेच किर्तन ठेवण्यात आले आहे. 


चार ऑक्टोबरला होमहवण कार्यक्रम संपन्न होणार आहे. पाच ऑक्टोबरला कुंडवस्ती व मुंबईकर मंडळातर्फे पालखी सोहळा व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच ते सात दरम्यान शिरूर तालुक्यातून तसेच निघोज परिसरातील भावीक मोठ्या संख्येने पायी वारी दिंडीत प्रतिदिन सामील होऊन सकाळी सातच्या दरम्यान होणाऱ्या महाआरतीसाठी उपस्थीत राहतात. 

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन कुंड माउली नवरात्र उत्सव मंडळ, निघोज ग्रामस्थ, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट,निघोज ग्रुप ग्रामपंचायत व मुंबईकर मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. दररोज हजारोंच्या संख्येने भाविक या दिवसभराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात.कुंडमाउली नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने उपस्थीती भावीकांना खिजडीचा महाप्रसाद दिला जातो. 

गेली दोन वर्षं कोरोनामुळे गर्दीवर मोठ्या प्रमाणात शासकीय नियंत्रण असल्याने   भावीकांना दर्शन घेता आले नाही. यावर्षी मात्र जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील पाण्याचे नयनरम्य दृश्य पहाण्यासाठी तसेच मंळगंगा देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भावीकांची गर्दी होत आहे. गेली चार दिवसांत पन्नास हजार पेक्षा जास्त भावीकांनी दर्शनाचा लाभ घेतला असून बाळासाहेब गायखे, साईराम गायखे या गायखे बंधू  कुटुंबातील सदस्यांना या पुजाऱ्यांना गेली शेकडो वर्षांपासून या कुंडमाउली मंळगंगा देवीचा पुजेचा मान आहे.


निसर्गरम्य जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रुप ग्रामपंचायत या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून हा परिसर पहाण्यासाठी तसेच कुंडमाली मंळगंगा देवीचे दर्शन घेण्यासाठी भावीक व पर्यटक लाखोंच्या संख्येने या ठिकाणी येत असतात. देवीची चैत्र महिन्यात पोर्णीमेच्या दरम्यान मोठी यात्रा भरत असते. 

या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून जवळपास पाच ते सहा लाख भावीक उपस्थीत असतात. वर्षभर विविध उस्तवाच्या माध्यमातून या ठिकाणी भावीक व पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. जगप्रसिद्ध रांजणखळगे या पर्यटन क्षेत्राची नोंद वर्ल्ड ऑफ गिनीज बुक मध्ये झाली असून परदेशी पर्यटक सुद्धा जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसर पहाण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. 

गेली दहा वर्षात आमदार, खासदार निधीतून तसेच शासकीय योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट,निघोज ग्रुप ग्रामपंचायत, निघोज ग्रामस्थ मुंबईकर मंडळ यांच्या पाठपुराव्यामुळे विकासकामांना गती मिळाली असून येत्या वर्षभरात आमदार निलेश लंके, खासदार डॉ सुजय विखे पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पाच ते दहा कोटींची विकासकामे मार्गी लागतील अशी ग्वाही निघोज ग्रामस्थांनी दिली आहे.  

निघोज गावांमधील मंळगंगा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दांडीया रास,स्वरगंध, कलगी तुरा,भजन, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, होम मिनिस्टर सन्मान श्री शक्तीचा खेळ पैठणीचा, गौरव माझ्या महाराष्ट्राचा हा ऑर्कैष्ट्रा, अशा प्रकारे कार्यक्रम ठेवण्यात आले  आहे. 

दररोज रात्री महिलांसाठी दांडीया रास कार्यक्रम असून जवळपास शेकडो महिला या ठिकाणी भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवीत आहेत. रविवार दि. २ रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट व निघोज ग्रुप ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आले आहे. 


दररोज सायंकाळी सात वाजता महाआरतीसाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात. गायखे कुटुंबाकडे गेली शेकडो वर्षांपासून या देवीच्या पुजेचा मान आहे. दररोज पहाटे देवीची पूजा अर्चा, अभिषेक, मंदीर स्वच्छता,या बाबींकडे गायखे कुटुंबातील सदस्य लक्ष देउन काम करीत असतात. 

दररोज पहाटे श्री स्वामी समर्थ सेवेकरी भक्त तसेच देवींचे पुजारी ठकाराम गायखे व सुनिल गायखे यांच्या माध्यमातून शेकडो महिला दुर्गा सप्तशती पठण करतात यामध्ये सरपंच चित्राताई वराळ पाटील सहीत गाव व परिसरातील शेकडो महिला सहभागी झाल्या असून नवरात्रीत दुर्गा सप्तशती पाठाचे विशेष असे महत्त्व शास्त्रामध्ये सांगितले आहे. 

सप्त  म्हणजे सात,  शत म्हणजे शंभर,अशा सातशे श्लोकात्मक तृणात्मिका महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीचे महात्म्य वर्णन म्हणजे सप्तशती,  अठरा पुराणापैकी मार्कयेंड पुराणातील ८१ ते ९३ अध्यायांमध्ये हे ७०० श्लोक आहेत. तसेच कवच,अर्गला, किलक , नवार्ण जप हे तीन प्रकारचे रहस्य देखील दुर्गा सप्तशतीमध्ये आहेत. 

या सर्वांच्या एकत्रित पठणाला सप्तशतीचा पाठ असे म्हणतात. गेली शेकडो वर्षांपासून या देवीच्या पुजेचा मान गायखे कुटुंबाचा आहे.१८०० वर्षांपूर्वीचे हे मंळगंगा देवी स्थान असल्याचा उल्लेख धर्मग्रंथात आहे. जागृत देवस्थान म्हणून राज्यात आणी राज्याबाहेर या मंळगंगा देवीचा नावलौकिक असून वर्षभरात विविध उस्तवाच्या माध्यमातून लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करीत असतात.

तिर्थक्षेत्र अंतर्गत निघोज ग्रुप ग्रामपंचायत , मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रामस्थ , मुंबईकर मंडळ यांच्या पाठपुराव्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागली आहेत. 

 मंगळवार दि. ४ रोजी होमहवन तसेच बुधवारी दि.५  रोजी दसरा निमित्ताने मंळगंगा देवीच्या पालखीची मिरवणूक अशाप्रकारे कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट,निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ तसेच मुंबईकर मंडळ यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post