आढळगाव गटात खासदारांच्या दौर्यावर नाराजी....जिल्हा परिषद सदस्यांनी टाळले का?....

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा: नगर दक्षिण चे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी आढळगाव जिल्हा परिषद गटातील विविध गावात जलजीवन योजनेच्या कामांचे भूमिपूजन कार्यक्रम केले. या कार्यक्रमात नाराजी असल्याचे दिसून आले. 


या कार्यक्रमाला या गटाचे माजी जिल्हा परिषद पंचशीला गिरमकर यांची अनुपस्थिती सर्वांच्या नजरेत भरली. त्यामुळे या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्यांनी खासदारांना टाळले ? का खासदारांनी सदस्यांना टाळले अशी चर्चा आढळगाव गटात सुरू होती. 

आढळगाव जिल्हा परिषद गटातील घोडेगाव, हिरडगाव, चांडगाव या गावांमध्ये जनजीवन योजनेच्या कामांचे भूमिपूजन आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाला आमदार बबनराव पाचपुते हेही उपस्थित होते. 

या कार्यक्रमात नाराजी दिसून आली. या गटाचे मागील पाच वर्षे ज्यांनी प्रतिनिधित्व केले. त्या जिल्हा परिषद सदस्या सौ. पंचशीला गिरमकर यांना मानणारा मोठा गट आहे. त्यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात गटातील प्रत्येक गावात विकास कामांसाठी निधी दिला आहे. त्यामुळे त्यांना माणणारा मोठा वर्ग तयार झाला आहे. 

त्यांच्याच गटात भूमिपूजन होताना सदस्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्यांना माननार्या गटातून आजच्या कार्यक्रमातून नाराजी व्यक्त होताना दिसली. त्यामुळे या कार्यक्रमात सदस्यांनी खासदारांना टाळले का? खासदारांनी सदस्यांना टाळले हिच चर्चा होती. या बाबत गिरमकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post