अनाथ विद्यार्थी, निराधार वृद्ध व वंचित आदिवासी कुटुंब यांच्यासोबत दिवाळी साजरी...महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अहमदनगर शाखेचा स्तुत्य उपक्रम...

संगमनेर : आपण समाजाचे देणे लागतो.या जाणिवेतून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अहमदनगर शाखा राज्य नेते रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. यासाठी संघटनेचे कार्यकर्ते वर्गणी काढून निधी संकलन करत असतात. 


दरवर्षी संघटनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'वंचितांची दिवाळी उपक्रमांतर्गत' २७ ऑक्टोबरला संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार संचलित साई सेवा सेंटर संस्थेतील अनाथ विद्यार्थ्यांना व वयोवृद्ध नागरिकांना ब्लँकेट, टाॅवेल व दिवाळी फराळ भेट देण्यात आले. 

खांडगाव येथील साकुरेमळा वस्तीवरील गरजू आदिवासी कुटुंबांना ब्लँकेट, टाॅवेल आणि दिवाळी फराळ भेट देण्यात आले. या प्रसंगी शिक्षक परिषद अध्यक्ष प्रविणदादा ठुबे, उच्चाधिकार समिती जिल्हाध्यक्ष आर. पी. रहाणे, गणेश वाघ, सोमनाथ घुले, संतोष खामकर,शिवाजी कोरडे, अशोक शेटे ,बाबुराव कदम ,रविंद्र भालेराव सामाजिक कार्यकर्ते भिमाशंकर पांढरे यावेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post