युगंधरा गृपतर्फे वृध्द महिलांना साडी वाटप...

राहुरी : युगंधरा सामाजिक व सांस्कृतिक ग्रुपच्या अध्यक्षा विद्या करपे सचिव गीता जग्गी व सर्व सदस्या यांनी  दिवाळीनिमित्त गरजू , विधवा, वृध्द महिला यांना साड्या वाटप करण्यात आले.


यावेळी ग्रुपच्या पदाधिकारी मंजुषा धावडे, वर्षा पाटील, शुभा कुलकर्णी, प्रमिला गावडे, डॉ. मनीषा क्षीरसागर, राखी दायमा,  रोहिणी काळे, सुनंदा परदेशी, दर्शना लुक्कड, मनीषा महाजन, शेवाळे काकी, उपस्थित होत्या.

युगंधरा प्रतिष्ठान यांच्या कडून 14 वर्षापासून प्रत्येकवेळी अनाथ, गरजू, वृध्द यांच्यासाठी दिवाळी साजरी केली जाते. ग्रुपच्या प्रत्येक सदस्या समाजसेवेचे मनस्वी कार्यरत असतात. कोरोनाच्या काळातही वांचितासाठी अनेक उपक्रम केले आहेत 

ग्रुपचे कार्य फक्त जिल्ह्यातच नाही तर आदिवासी भागातही  विद्यार्थ्यासाठी कार्य चालू आहे. युगंधरा ग्रुपच्या अध्यक्षा विद्या करपे व त्यांच्या पदाधिकारी यांनी गरजू, अनाथ, वृद्ध,विधवा यांसाठी विविध अभियान सुरू केले आहे. 

यामध्ये सांस्कृतिक आणि सर्व सणासह अनेक सर्व उपक्रम साजरे केले जातात. पूर्ण जिल्ह्यात युगंधरा ग्रुपचे फारच कौतुक होत असते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post