महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा कमी केलीय... या नेत्याची मात्र वाढवलीय....

मुंबई : एकीकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात किंवा कमी करण्यात आली असली तरी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर यांना आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.


महाविकासआघाडीच्या काही बड्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे.  अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे.  तुरुंगात असलेल्या संजय राऊत, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची सुरक्षा हटवण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कोणतेही हस्तक्षेप करण्यात आलेले नाहीत. 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. अजित पवार यांना आधी झेड प्लस सुरक्षा होती, त्यात बदल करून वाय प्लस एस्कॉर्ट करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post