पाकवर भारताचा विजय...

सीडनी ः  शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. 


विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या. त्याने हार्दिक पांड्याबरोबर पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत गेलेला सामना खेचून आणला. भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एक धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत सामना संपवला.

भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज असताना हार्दिक पांड्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिक मैदानात आला. मात्र तोही काही करू शकला नाही. परंतु अश्विनने चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्का मारला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post