नगर : जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम असले तरी राष्ट्रवादीला आगामी काळात भगदाड पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवदीचे नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात शिवसेना फुटल्यामुळे राज्यातील आघाडी सरकार पडले आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप नेत्यांकडून शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फूट पडणार असल्याचे जाहीर वक्तव्य केले जात आहे.
भाजप नेत्यांची वक्तव्य खरे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील आजी-माजी आमदार यांनी भाजपाशी जवळीक साधली आहे. भाजपाचे खासदार व राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार कायम बरोबर रहात आहे.
अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र रहात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार आहेत , की भाजपाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरामुळे अनेक जण आता तक्रारीकरणार आहेत. पक्षाशी एकनिष्ठ नसणार्यांना आताच पक्षातून बाहेर काढावे, अशी मागणी होत आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेते आता काय भूमिका घेतात, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहेत. काहीजण नुकतेच बाहेर पडले असून शिंदे गटात दाखल झालेले आहेत. आणखी काहीजण दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment