कर्जत : कोळवडी (ता कर्जत) येथील संदीप दत्तात्रय शेटे या शिक्षकाने पत्नी सुवर्णा व तिचे नातेवाईक यांच्या त्रासाला कंटाळून राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे.
स्वतःच्या हाताने तीन पानांचे पत्रदेखील लिहिले आहे. यामध्ये त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याचा उल्लेख केला आहे. याप्रकरणी ज्ञानदेव दत्तात्रय शेटे यांच्या फिर्यादीवरून संदीप यांच्या पत्नीसह सतरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
Post a Comment