अकोले : परप्रांतीय तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. मुलगी गर्भवती राहिल्याने आरोपी रामशरण मनिलाल सरोज (रा. खाचकिमई, तहसील सरोज, जि.कौशाबी रा.उत्तर प्रदेश) यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अकोले पोलीस स्टेशनला अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली. तालुक्यात निळवंडे कालव्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील एका गावाजवळ कालव्याच्या कामावर असलेला उत्तरप्रदेशातील परप्रांतीय तरुण रामशरण मनिलाल सरोज याने ऑगस्ट २०२२ पासून अल्पवयीन मुलगी माहित असताना देखील ओळख वाढवून तिच्याशी प्रेम संबंध निर्माण केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
शारीरिक संबंध ठेवल्याने आरोपीपासून पीडित मुलगी गर्भवती राहिली. पोलिसांनी रामशरण सरोज याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हांडोरे करत आहे.
Post a Comment