पारनेर : भूविकास बॅकेच्या संदर्भात जेष्ठे नेते शरद पवार यांनी केलेले वक्तव्य राजकीय हेतूने आहे. यापूर्वी सर्व सतास्थाने ताब्यात असतांना सुध्दा भूविकासच्या कर्जदार शेतकर्यांचे सातबारा त्यांंना कोरे करता आले नाहीत.
आता शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या कर्जमाफी निर्णयाचे त्यांना दुखः होत असल्याचा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
पारनेर येथे अतिवृष्टी नुकसानीच्या पाहाणी दौर्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विखे म्हणाले, शिंदे- फडणवीस सरकार राज्यात शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे. शेतकरी हाच आमचा प्राधान्यक्रम आहे.
वर्षानुवर्षे या शेतकर्यांच्या उतार्यावर कर्जाचा बोजा होता. यातून शेतकर्यांची मुक्तता व्हावी म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने भुविकास बॅकेच्या कर्जदार शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी केंद्रात आणि राज्यात सर्व सतास्थाने ताब्यात असतांना सुध्दा ज्यांना हा निर्णय करता आला नाही. त्यांना या निर्णयाचे दुख होत असल्यानेच या निर्णयावर राजकीय हेतूने वक्तव्य केले असल्याची टिपणी महसुलमंत्री विखे पाटील यांनी केली.
Post a Comment