अधिकार्याच्या राजीनाम्याने श्रीगोंद्यात वादळीर्चा....

अमर छत्तीसे

श्रीगोंदा : तालुक्यातील एका मोठ्या गावातील एका स्थानिक अधिकार्याने  राजीनामा दिल्याची चर्चा आहे. या राजीनामा नाट्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून की राजकीय दबावाला वैतागून संबंधित अधिकार्याने राजीनामा दिला हा चर्चेचा विषय ठरला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या गावातील स्थानिक एका अधिकार्याने राजीनामा त्यांच्या कार्यालयीन प्रमुखाकडे सादर केला आहे. तो मंजूर झाला की नाही याबाबत स्पष्ट झालेले आहे.

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अनेक कार्यालयात काहीजण काम करत आहेत,  तर काहीजण बदल्या करीत आहेत. काहीजण तर राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. 

श्रीगोंदा तालुक्यातही एका कर्मचार्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीनामा प्रकरणाने तालुक्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यामुळे राजकीय संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. अचानक स्थानिक अधिकारी थेट राजीनामा देण्याचे पाऊल उचलतात हे विशेष पण लोकप्रतिनिधीच्या गावातील ही अवस्था असेल तर ही मोठी शोकांतिका आहे. या संबंधित अधिकारी यांनी वरिष्ठांच्या जाचामुळे राजीनामा दिला की राजकीय दबावामुळे  राजीनामा दिला याचीच चर्चा चालू होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post