शिंदे गट पुन्हा गोहाटीला जाणार...

मुंबई : राज्यात काही महिन्यांपूर्वी मोठी राजकीय घडामोड झाली. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत आसाममध्ये मुक्कामाला होते. तेव्हा राज्याचे केंद्रबिंदू हे आसाममधील गुवाहाटी हे होते. 


तेव्हाही शिंदे यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. दरम्यान आता गुवाहाटी दौरा कसा असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहेत. विशेष म्हणजे शिंदे आपल्या सर्व आमदारांसह गुवाहाटी दौरा करणार आहेत. ठाण्याच छटपूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिंदे यांनी गुवाहाटी दौऱ्याला जाणार असल्याची घोषणा केली. 

गुवाहाटी दौऱ्यात मुख्यमंत्री व आमदार हे कामाख्या देवीचे पुन्हा दर्शन घेणार आहेत. तसेच शिंदे सरकारमधील मंत्री आणि समर्थक आमदार अयोध्या वारीलाही जाणार आहेत. दरम्यान हा दौरा कधी असणार आहे, याबाबतची माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. 

शिंदे गटात अंतर्गत संघर्ष वाढत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या बाहेर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post