स्वत:च सरण रचून तरुणाची आत्महत्या...

नगर : शेतातील लाकडे जमा करून घराच्या पाठीमागे लाकडाचे सरण रचून त्यावर स्वत:ला तारेच्या सहाय्याने बांधून पेटवून घेत २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना चांदा लोहारवाडी (ता. नेवासा) शिवारात घडली. 


रविवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चांदा-लोहारवाडी-महालक्ष्मी हिवरा रस्त्यावर पुंड वस्ती आहे. येथील अनिल साहेबराव पुंड याने घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात रविवारी पहाटेच्या सुमारास लाकडाचे सरण रचले. 

त्यावर ठिबक सिंचनच्या जुन्या प्लॅस्टिक नळ्या अंथरून स्वतःला लोखंडी तार गुंडाळून पेटवून घेतले. पुढील तपास सहायक फौजदार काकासाहेब राख करीत आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post