अमर छत्तीसे
श्रीगोंदा : सरकारी कार्यलायासह खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये अधिकार्यांना दोन-पाचची दारू पाजून व जेवन देऊन काहीजण आपली खासगी कामे उरकून घेत असल्याची चर्चा कर्मचार्यांमध्ये सुरु आहे.
कोरोनामुळे खासगी कंपन्यांमधील अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. काहींच्या रोजगारावर कुर्हाड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकजण रोजगार टिकविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांमध्ये काहीजण वरिष्ठांना खूश वस्तू भेट, रात्रीच्या पार्ट्या देत आहेत.
तशीच काहीशी परिस्थिती सरकारी व निमसरकारी कार्यालयात झालेली आहे. कार्यालयांमध्ये चांगले टेबल मिळण्यासाठी सध्या वरिष्ठांना खूश करण्यासाठी रात्रीच्या पार्ट्यां दिल्या जात असल्याची चर्चा कर्मचार्यांमध्ये रंगत आहे.
काहींनी वरिष्ठ आपल्यावर उलटण्याची शक्यता गृहीत धरलेली आहे. त्यामुळे वरिष्ठांना पार्टी देऊन त्या पार्ट्यांचे चित्रीकरण करून ठेवले आहे. साहेबाने धोका दिल्यास ते वरिष्ठांना पाठवण्याचे नियोजन केलेले आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
काही वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी तालुका पातळीवर भेटीला जात आहेत. तेथे गेल्यानंतर काहीजण तालुका पातळीवर पार्ट्या करीत आहेत. या पार्ट्यांची चर्चा चांगली होत आहे.
Post a Comment