शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र कमी होण्याची शक्यता

नगर ः इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा यंदापासून फेब्रुवारीत होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. कोरोना काळात वाढलेली परीक्षा केेंद्राची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.


शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर सलग दोन वर्षे पडली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परीक्षा उशिराने घेतल्या होत्या. उशिराने झालेल्या परीक्षांचे फायदे व तोटे दोन्ही दिसून आलेले आहेत. 

यंदाच्या वर्षीची परीक्षा कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र यंदाच्या वर्षी ही परीक्षा फेब्रुवारीत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता सर्व शाळांमध्ये परीक्षेची तयारी करून घेण्यावर भर दिला जात आहे. 

सध्या सर्व शाळांचा शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला आहे. आता विद्यार्थ्यांकडून प्रश्न पत्रिका सोडवून घेतल्या जात आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आता सराव परीक्षा सुरु झालेल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनानेही सराव परीक्षेसाठी प्रश्न पत्रिका तयार करून दिलेल्या आहेत. त्याचाही विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी आता चांगला फायदा होत आहेत. 

कोरोना काळात जिल्ह्यात परीक्षा केंद्र वाढविण्यात आले होते. त्याचा फायदा चांगला झालेला आहे. हे परीक्षा केंद्र कायम रहातील, असे सर्वांना वाटत होते. मात्र परीक्षा केंद्र कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा विद्यार्थ्यांना बाहेर गावी जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post