एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ...

मुंबई ः राज्य सरकारने एसटी महामंडळाला पत्र सुद्धा पाठविले आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच 34 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. 


हा निर्णय मागील काही काळापासून राखडला होता. राज्य सरकार कडून हा निर्णय घेण्यास उशीर होत असल्याने एसटी कामगार संघटना आक्रमक झाली होती. परंतु आता हा निर्णय झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.


एसटी कामगार संघटना आक्रमक होत त्यांच्याकडून थेट आंदोलनाचा इशारा देण्यात आला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता असून, एसटी कर्मचाऱ्यांना मात्र 28 टक्के भत्ता देण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांना त्यावरच समाधान मानावे लागत होते. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्त तरी टळले आहे. आता पगार वाढणार असल्यामुळे कर्मचार्यांना कामेही करावी लागणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post