पुणे ः शहरातील पिंपळे सौदागर परिसरातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाची दोन ग्राहकांनी हत्या केली. ही हत्या सुपात भाताचे कण दिसले म्हणून हा खून करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपी दारूच्या नशेत होते. मटण सूपमध्ये भात सापडल्याने ते संतप्त झाले आणि त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेत मंगेश पोस्टे या 19 वर्षीय वेटरचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला.
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये काही लोकांमध्ये हाणामारी होताना दिसत आहे. विजय वाघिरे असे एका आरोपीचे नाव असून अन्य आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे आता हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा घटना घडू लागल्या तर हाॅटेलवर कामाला कसे जायचे, असा प्रश्न आता कर्मचार्यांमधून मालकांना केला जात आहे.
Post a Comment