काष्टीत “भैया” ला विरोध...

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या काष्टी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक प्रकिया सुरु झाली आहे. नुकतेच आमदार बबनराव पाचपुते यांनी गावातील प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेतली. मात्र या बैठकीत एका “भैयाला विरोध तर दुसऱ्या भैयाची गैरहजेरीच चर्चेचा विषय ठरला आहे. 


काष्टी हे गाव आमदार बबनराव पाचपुते यांचे गाव म्हणून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वर्गीय सदाशिव पाचपुते यांनी गावातील सत्ता ताब्यात ठेवण्याला नेहमीच प्राधान्य दिले होते. यावर्षीची पहिलीच निवडणूक आण्णांच्या गैरहजेरीत होत आहे. आमदार पाचपुते यांना गावातच खिंडीत गाठण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली असतानाच आमदार पाचपुते यांनीही हि निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे दिसते. 

नुकतीच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत आमदार बबनराव पाचपुते यांचे धाकटे चिरंजीव प्रताप पाचपुते यांच्या उमेदवारीला विरोध झाला असल्याचे समजते. त्याचबरोबर साजन शुगरचे अध्यक्ष साजन पाचपुते यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. 

मागील काही महिन्यांपूर्वी साजन पाचपुते यांनी पाचपुते कुटुंब एकच आहोत, असे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. आमदार बबनराव पाचपुते व मी एकत्र आहोत. दादांचा निर्णय अंतिम असणार आहे, असे जाहीर केले होते. 

मात्र सध्या गावची निवडणूक लागली असताना साजन पाचपुते काय भूमिका घेतात यावर चर्चा होत आहे. ते आमदार पाचपुते यांचा निर्णय मान्य करतात का सवतासुभा उभा करतात याकडे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post