पारनेरात बिबट्या जेरबंद...

निघोज : शनिवारी रात्री दहाच्या दरम्यान पारनेर तालुक्यातील पठारवाडी शिवारात विहीरीत पडलेल्या मादी असणाऱ्या बिबट्याला काढून पिंजराबंद करण्यात वनसंरक्षक विभागाच्या वडझिरे मंडल अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले असून अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  पठारवाडी येथील जितेंद्र बबन सुपेकर यांची विहीर गट नंबर ३१७ मध्ये आहे. भक्ष्याचा पाठलाग करताना विहीरीचा अंदाज न आल्याने बिबट्या विहिरीत पडला. 


बिबट्याने संपूर्ण रात्र  पाइपलाइनच्या लोखंडी पोलला धरीत काढली. कधी विहीरीत तर कधी पोलचा आधार घेत त्याने वर येण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र तो सकाळी १० वाजेपर्यंत विहीरीत होता. सकाळी जितेंद्र सुपेकर यांनी बिबट्या विहिरीत पडल्याचे पाहिले.लगेच गावातील मित्रांना सांगत त्यांनी वन‌पाल एन एस जाधव यांना सांगितले त्यांनी व त्यांचे सहकारी वनरक्षक यु पी खराडे यांनी बिबट्याला पिंजराबंद करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करीत पिंजरा विहीरीपासून पाच फूट अंतरावर आणला. 

दोरखंडाच्या मदतीने व पिंजरा विहीरीत टाकून  बिबट्या बरोबर पिंजऱ्यात जाईल अशी व्यवस्था केल्याने बिबट्या पिंजराबंद झाला. पाच वर्ष वय असणाऱ्या या मादी बिबट्याचे वजन साधारण ८० ते ९० किलो असण्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.यासाठी वडझिरे येथील वनपाल एन एस जाधव, वनरक्षक यु पी खराडे, अळकुटी येथील वनरक्षक एच डी आठरे, वनसेवक विठ्ठल वाढवणे, वनसेवक परवेझ शेख, वनमजूर जगताप, वनमजूर पाडळे तसेच विहीर मालक जितेंद्र सुपेकर यांनी व सुपेकर यांचा मित्रपरिवार व ग्रामस्थ या सर्वांनीच सहकार्य करीत बिबट्या पिंजराबंद केला. निघोज येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून बिबट्या यास उपचार करीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी घेउन गेले. 

बिबट्या विहिरीत पडला असल्याची माहिती सोशल मीडिया माध्यमातून सर्वत्र माहिती झाल्याने बिबट्या पाहाण्यासाठी  सुपेकर यांच्या शेतात गर्दी झाली होती. मात्र पठारवाडी येथील युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी संयम राखीत कुणालाही विहीराजवळ जाउ दिले नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post