वैद्यकीय बिलासाठी शिक्षण विभागात लाच मागणाऱ्या महिलेवर गुन्हा....

नगर :  कोरोनामुळे आजारी असलेल्या पत्नीच्या उपचाराचे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी पाच हजारांची लाच घेतल्याच्या आरोपावरून प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक चंदा चंद्रकांत ढवळे (वय ४५) पकडण्यात आले. 


तक्रारदार हे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांची पत्नी मे व जून २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी अहमदनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. 

तक्रारदार यांनी पत्नीचे वैद्यकीय उपचाराचे बिल स्वतः भरले व त्यानंतर सदरचे बिल जिल्हा परिषदेमधून मंजूर होण्यासाठी सर्व आवश्यक त्या कागदपत्रांसह श्रीरामपूर पंचायत समितीमार्फत जुलै २०२१ मध्ये दाखल केले होते. 

हे बिल मंजूर करण्यासाठी आरोपी लोकसेविका  ढवळे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार लाचेची मागणी केली. शिक्षकाने अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. 

त्या तक्रारीचे अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे, शरद गोरडे यांनी सात नोव्हेंबर २०२२ला जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग येथे पंच साक्षीदार समक्ष लाच मागणी पडताळणी केली. 

त्यावेळेस आरोपी लोकसेविका चंदा ढवळे यांनी ५ हजारांची मागणी करून सदर रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. लोकसेविका ढवळेविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post