मुंबई : अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली. महिला आयोगाने पोलीस महासंचालकांना कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात आंदोलन केलं आणि सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपनेही सत्तार यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली. यानंतर एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तार यांना माफी मागण्याचे आदेश दिले. शिंदेंनी कानउघाडणी केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी माफीही मागितली.
महिला आयोगाने अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याविरोधात त्वरित कारवाई केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे.
Post a Comment