निघोज : वर्षानुवर्षे उन्हाळा आला की पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच पाउसाळा आला की दुषीत पाणीपुरवठा यामुळे गेली अनेक वर्षांपासून निघोज ग्रामस्थ त्रस्त झाले होते. मात्र निघोज ग्रामपंचायतवर संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनची सत्ता आल्यास नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले होते.
गेली सहा महिन्यांपूर्वी निघोज ग्रामपंचायत माध्यमातून स्वच्छ पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करीत संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी चर्चा करीत निघोज व परिसरातील जनतेसाठी स्वच्छ पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी प्रस्ताव देण्यासंदर्भात चर्चा झाली होती.
त्यानंतर मंत्री पाटील यांच्या सुचनेनुसार वराळ पाटील यांनी याबाबत नगर विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा करीत प्रस्ताव कशा पद्धतीने तयार करुन सादर करायचा याबाबत सविस्तर माहिती घेतली.
याबाबत सर्व कागदपत्रे तयार करीत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे मार्गदर्शन घेत याबाबत दिल्ली येथील जिवण प्राधिकरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळण्यासाठी दिल्ली येथील अधिकाऱ्यांनी निघोज येथे भेट देउन पहाणी करुन सविस्तर माहिती घेउन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सुपूर्द केला आहे.
यासाठी नगर विकास प्राधिकरण अधिकारी तसेच व अहमदनगर येथील जिवण प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मुळे साहेब यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. या योजनेसाठी निघोज ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शिरसुले परिसरातील जमीन हस्तांतरित करुन या ठिकाणी स्टोरेज टॅंक व जलशुद्धीकरण प्रकल्प होणार असून तसेच सहा ठिकाणी वाडी वस्तीवर पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम होणार आहे.
यासाठी १९ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.तसेच नगर विकास प्राधिकरण मार्फत पाणी वितरण व्यवस्थेसाठी दहा कोटी रुपये खर्च होणार असून अशा प्रकारे ही स्वच्छ पाणीपुरवठा योजना जवळपास ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
निघोज गावची व परिसराची वाडी वस्ती लोकसंख्या वीस हजार पेक्षा जास्त असून जनतेला स्वच्छ पाणीपुरवठा व नियमीत पाणी मिळण्यासाठी या पुढील काळात ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार असून ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पुर्तीबद्दल व या योजनेसाठी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी मार्गदर्शन करीत या योजनेला पाठबळ दिल्याबद्दल तसेच राज्य सरकार, केंद्र सरकारचे अधिकारी व मंत्री यांना धन्यवाद देत निघोज ग्रामवासीयांनी आभार मानले आहेत.
स्वच्छ पाणीपुरवठा योजना ३० कोटी रुपये,घनकचरा प्रकल्प ८५ लाख रुपये अशा प्रकारे या दोन्ही विकास प्रकल्पांना लवकरच सुरूवात होत असून येत्या वर्षभरात ही कामे जलदगतीने व परिपुर्ण होणार असून लवकरच ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करुन दोन वर्षात निघोज व परिसरातील दहा ते पंधरा गावांना फायदा होईल असे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय निघोज या ठिकाणी दोन वर्षात उभे राहणार असून हीच वचनपूर्ती विकासाची खरी पायाभरणी असून या साठी निघोज ग्रुप ग्रामपंचायत, ग्रामस्थ, यांनी जे पाठबळ दिले असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.
Post a Comment