जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन...

नगर : वाकोडी फाटा ते वाळकी या 18 किलोमीटर रस्त्याचे (प्र.जी. मा- 81) काम मागील दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या देखरेखी खाली करण्यात आले आहे.  


ते अत्यंत खराब झाल्याने हा रस्ता ठेकेदाराकडून तत्काळ दुरुस्त करून घेण्यात यावे या मागणीचे निवेदन जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी के. एम. डोंगरे यांना देण्यात आले.

या वेळी आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शहर अध्यक्ष शहानवाज शेख, अमित गांधी, दीपक गुगळे, गौतमी भिंगारदिवे, विजय मिसाळ आदी उपस्थित होते.          

वाकोडी फाटा ते वाळकी या 18 किलोमीटर रस्त्याचे (प्र.जी.मा.- 81)काम मागील दोन वर्षांपूर्वी पूर्ण केलेला आहे. त्यानंतर केवळ चार महिन्यात या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडून खराब झाले होते. त्यावेळी देखील जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने त्या विषयाचा आवाज उठवल्याने तो रस्ता दुरुस्त केला होता. 

परंतु रस्त्याचे काम सुरू होत्या वेळी ते तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसल्यानेच कमी कालावधीत रस्त्याची अवस्था बिकट झाली. दोन वर्षानंतर हा 18 किलोमीटर रस्ता लाखो रुपये खर्च करून जवळपास अर्ध्याच्या वर खराब झालेला आहे. ज्या रोडच्या कंत्राट एजन्सीने हा रस्ता बनवलेला आहे.

त्यांच्याकडे या रस्त्याची दुरुस्तीचा कालावधी जवळपास सहा महिने शिल्लक असल्याने त्यांनी तातडीने या रस्त्याचे काम व्यवस्थित करून घ्यावे त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला दळणवळण करताना अनेक समस्या येत असुन हे काम आपण पुढील आठ दिवसाच्या आत सदर रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा जनआधार संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post