मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे.
राज्याच्या राजकारणात आता नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
अब्दुल सत्तार यांच्या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. पुढच्या 24 तासात अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी अन्यता आमच्या भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
Post a Comment