पांढरकरवाडी येथील शिवसेना शाखेचे कामकाज कार्यक्षमतेने होणार...

निघोज : निघोज परिसरातील पांढरकरवाडी ही छोटीसी वाडी असूनही माजी आमदार विजय औटी यांच्या कार्यसम्राट पदाची दखल घेत पांढरकरवाडी शिवसेनामय झाली आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले आहे. 


पांढरकरवाडी येथील शिवसेना पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार नुकताच माजी आमदार विजय औटी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ दाते, डॉ.भास्कराव शिरोळे, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख प्रियंका खीलारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ पठारे बोलत होते. 

यावेळी महिला आघाडीच्या निघोज गट प्रमुखपदी पायल पांढरकर, गटप्रमुखपदी महेंद्र पांढरकर, निघोज शहरप्रमुख पदी रविंद्र पांढरकर, शाखा प्रमुख तुकाराम पांढरकर, उपप्रमुख अमोल पांढरकर, सचिव सुरेश रासकर, सहसचिव सुनिल गाडीलकर, खजिनदार बाळासाहेब पांढरकर, संघटक - अनिल पांढरकर, यशवंत पांढरकर,प्रकाश पांढरकर, वसंत पांढरकर, गणेश गारुडकर , गोपीनाथ पांढरकर , नामदेव पांढरकर, अविनाश पांढरकर, सुखदेव पांढरकर, नारायण पांढरकर, राहुल पांढरकर, भाऊसाहेब पांढरकर, राहुल रासकर, भाऊसाहेब पांढरकर, विजय पांढरकर, ओमकार पांढरकर, बाबासाहेब पांढरकर , संतोष गारुडकर, सुभाष पांढरकर, महेश पांढरकर, नामदेव पांढरकर ज्येष्ठ मार्गदर्शक - कैलास पांढरकर, रामचंद्र पांढरकर, सुदाम गारुडकर, गणपत पांढरकर, राजाराम पांढरकर, मळीभाऊ पांढरकर, किरण पांढरकर, भाऊसाहेब पांढरकर, मारुती पांढरकर, राजाराम पांढरकर, मच्छिंद्र गारुडकर, दौलत पांढरकर, सदस्य- अनिल पांढरकर, शरद पांढरकर, गोकुळ पांढरकर, गणेश पांढरकर, सिद्धेश पांढरकर, नितीन पांढरकर, वसंत पांढरकर, देवीदास पांढरकर,सागर पांढरकर, सोपान पांढरकर,विलास पांढरकर, विकास पांढरकर, सुनिल पांढरकर, सचिन पांढरकर, नामदेव पांढरकर, जालिंदर पांढरकर, वरुण पांढरकर, शहाजी वराळ, मासाळकर मेजर, योगेश वराळ, गणेश वराळ, नवनाथ पांढरकर, सिताराम शेंडकर आदिंची नियुक्ती केली असून वरील सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक, सदस्य यांना मान्यवरांच्या हस्ते पत्र देऊन नियुक्ती केली असल्याची माहिती निघोज गट प्रमुख महेंद्र पांढरकर यांनी दिली. 

माजी आमदार विजय औटी यांचा कार्यक्षमपणा व त्यांनी दिलेला साडेचार कोटी रुपयांचा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा रस्ता की ज्या रस्त्याचे काम पुर्ण होउन तीन वर्षे झाली आहेत. मात्र तो रस्ता आहे तसाच आहे. जसा काय तो रस्ता वर्षांपूर्वी झाला आहे. 

अशाप्रकारे रस्त्याचे काम दर्जेदार झाले असून यापुढे सुद्धा माजी आमदार विजय औटी यांच्या माध्यमातून पांढरकरवाडी परिसरात विकासकामे होणार असल्याची खात्री असून संपुर्ण पांढरकरवाडी शिवसेनामय झाली असल्याची माहिती पांढरकर यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post