जळगाव : प्रजासत्ताकदिनी ग्रामसेवक लाच घेताना पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. या घटनेमुळेच एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षणाबाबतची माहिती तक्रारदाराने माहिती अधिकारातंर्गत ग्रामसेवकाकडे मागितली.
ही माहिती देण्याच्या मोबदल्याच अडीच हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
एकीकडे देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा होत असतांना याच दिवशी लाच घेताना ग्रामसेवकाला अटक केल्याच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. अनिल नारायण गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment