१०५ वर्षीय आजींच्या हस्ते झाले आरोग्य ग्राम जखणगावचे झेंडावंदन....

नगर : नगर तालुक्यातील जखणगांव हे गांव संपूर्ण आरोग्य ग्राम म्हणून राज्य स्तरावर गाजत आहे . प्रजासत्ताक दिनी नियमानुसार सरपंचाचे हस्ते झेंडावंदन करण्याचे आदेश शासनाने काढले होते. परंतु जखणगांव मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झेंडावंदन करून लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनिल गंधे यांनी एक नवा आदर्श सुरु केला.

ग्रामपंचायत कार्यालय येथे १०५ वय असुन सुद्धा आरोग्य दृष्ट्या तन्दुरूस्त असणार्या श्रीमती कोंडाबाई लहानु कर्डिले या सर्वात जेष्ठ महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .


प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ९९ वर्षांच्या  दगडाबाई दशरथ भिसे  यांच्या हस्ते तर जिल्हा बँक परिसरात सखाराम त्रिंबक कर्डिले या ज्येष्ठांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.लकार्यक्रमाला सरपंच डॉ. सुनिल गंधे, चेअरमन बाळासाहेब कर्डिले, माजी सरपंच बी. आर.कर्डिले, साबीया  शेख, स्नेहा काळे, प्रगती कर्डिले, नानी देवकर, गनी पटेल, मुजीब शेख, डॉ. राजेंद्र गंधे, फिरोज शेख, बाळासाहेब शहाणे, सुभाष सौदागर, पुणे जिल्हा ज्ञायाधीश सुहास दबडगांवकर,  प्रा. सीमा पांडे यांचे सह असंख्य नागरिक उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी शाळेच्या मुलांचा भाषणाचा व मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला. गणेश वाडी शाळेच्या आदिवासी मुलांनी सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली.सुत्रसंचालन बाळासाहेब वाबळे यांनी केले तर जालिंदर नरवडे यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post