अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

श्रीगोंदा : जिवे मारण्याची धमकी देऊन एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २९) गुन्हा दाखल झाला आहे. 


याप्रकरणी पीयूष बाळासाहेब घोडके (रा. सिद्धार्थनगर, श्रीगोंदा) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पीयूष घोडके याच्या विरोधात भादंवि कलम ३७६, ३२३, ५०६ पोस्को व माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००० चे ६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पीयूष घोडके हा फरार झाला आहे. ही घटना ऑक्टोबर २०२२ मध्ये घडली आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे. 

श्रीगोंदा शहरातील बायपास रस्त्याजवळील झाडीत ही घटना घडली आहे.  या प्रकरणातील आरोपी पसार असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी दोन पोलिस पथके तयार केली आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post