तांबे अन् पाटील यांच्यात लढत....

नाशिक : पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत असून ५ मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार म्हणून लढत असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 


नागपुरात गाणार-आडबोल यांच्यामध्ये देखील चुरशीची लढत असून गटबाजीमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासह अमरावतीमध्ये डॉ. रणजित पाटील विरूद्ध धीरज लिंगाडे यांच्यात लढत तर मराठवाड्यात किरण पाटील- विक्रम काळे यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.

खासदार सुजय विखे यांनी रात्रीतून चमत्कार घडणार असे वक्तव्य केले होते. आता अहमदनगर जिल्ह्यातील भाजप सत्यजित तांबेंच्या पाठीशी उभा राहिल्याचे स्पष्ट होत आहे. 

त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. भाजपातील विखे गट तांबे यांच्या पाठीशी असला तरी इतर भाजपाचे पदाधिकारी मात्र अलिप्त दिसून आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post