नगर ः शहरातील हॉटेल व उपहारगृहे रात्री ११ला बंद करण्याचा आदेश पोलिस अधीक्षकांनी जारी केलेला आहे. त्यामुळे शहरात रात्री अकराला शहर बंद होत आहे.
दोन दिवसांपूर्वीच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हा आदेश जारी केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आहे. त्यामुळे सध्या रात्री अकरालाच नगर शहर बंद होत आहे. मात्र इतर व्यवसाय रात्री जोमाने सुरु आहे. हे अवैध धंदे त्वरीत बंद करण्याची मागणी होत आहे.
शहर रात्री अकराला बंद होत असल्याने सर्वांना दिलासा मिळाला. मात्र कामगार वर्गाचे हाल होऊ लागले आहे. भूक लागल्यानंतर खायला काहीच मिळत नसल्याने अनेकांना उपाशी झोपावे लागत आहे.

Post a Comment