शुभांगी सुर्यवंशी यांना पाठिंबा वाढता...

नगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील ‘महाविकास आघाडी’च्या उमेदवार सौ. शुभांगी पाटील यांना जिल्ह्यात पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे.


नाशिक पदवीधर मतदारसंघातील ‘महाविकास आघाडी’च्या उमेदवार सौ. शुभांगी पाटील प्रचारार्थ अहमदनगर मध्ये आले असता त्यांचा सत्कार करतांना राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रा माणिकराव विधाते व राष्ट्रवादी महिला आघाडी चे शहराध्यक्ष रेश्मा आठरे यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी व्यापार सेल चे आनंदजी गारदे, ओबीसी सेलचे अमित खामकर,सेवा दलाचे विनोदजी साळवे,रेणुका पुंड व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. 

दरम्यान सूर्यवंशी यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या घरी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते घरी नसल्याने भेट झाली नाही. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post