मुंबई ः पंकजा मुंडे यांच्या कामात कुणीही हस्तक्षेप केलेला नाही व कोणीही हस्तक्षेप करणार नाही. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत, त्यांच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही,असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
पंकजा मुंडे या मागच्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यातच बावनकुळे यांनी सूचक विधान केले आहे.
बावनकुळे म्हणाले की, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कधीच थांबला नाही पाहिजे. आपल्या जिल्ह्यातील शिस्त आता बिघडवू द्यायची नाही. जिल्ह्याची घडी बसवण्यासाठी जिल्ह्याच्या मातीतील माणूस लागतो. बाहेरच्या लोकांनी जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये.
बीड जिल्ह्याच्या मतांमुळे महाराष्ट्राच्या विकासालाा मोठा फरक पडतो, सत्तेतील मंत्र्यांनी जिल्ह्याला भरभरून द्यावं, अशी अपेक्षा आहे. आमज माझ्याकडे कोणतेही पद नाही. आमचा सुखाचा संसार चालू द्या, आम्ही लोक मिळून आमचा जिल्हा चांगला सांभाळतो, असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलेे होते.
पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक चुकीची वागणूक दिली जात आहे, जाणूनबुजून काही लोक हे काम करत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, याबद्दल कारवाई करायला भाजप जिल्हाध्यक्षांना सांगितल्याचंही बावनकुळे म्हणाले.

Post a Comment