शिक्षकांमुळे संगमनेर शिक्षण विभागाचा नावलौकिक...

संगमनेर : शिष्यवृत्ती, नवोदय व विविध गुणदर्शन स्पर्धेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा साईबाबा हॉल संगमनेर महाविद्यालय येथे संपन्न झाला. 


कार्यक्रमाचे अध्यक्ष संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे  होते.  यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून काजळे ज्वेलर्सचे राजेंद्र काजळे, चाणक्य मंडळ पुणे च्या विश्वस्त मार्गदर्शिका रोहिणी गुट्टे व शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष शिक्षण तज्ञ संजय मालपाणी उपस्थित होते. 

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. तिला पैलू पाडण्यासाठी संगमनेर तालुक्यातील शिक्षक गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्पण वृत्तीने काम करत आहे. त्याचीच पोहोच पावती म्हणून हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. असे अध्यक्षपदावरून बोलताना अनिल नागणे म्हणाले.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष शिक्षण तज्ञ संजय मालपाणी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ३३ कोटी सूर्यनमस्कार स्पर्धेत संगमनेर शिक्षण विभागाने दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. 

खेलो इंडिया स्पर्धेत संगमनेर तालुका भारतात प्रथम आला. याचे श्रेय तालुक्यामध्ये जे चांगले शैक्षणिक वातावरण तयार झाले आहे, त्याला जाते असे ते म्हणाले. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ओंकारनाथ मालपाणी योगासने स्पर्धा घेण्याची घोषणा त्यांनी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांनी संगमनेर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गुणवत्तेचा उंचावत चाललेल्या आलेखाचा आढावा घेतला. या यशस्वी वाटचालीत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शना बरोबर गटविकास अधिकारी अनिल नागणे व शिक्षणतज्ञ संजय मालपाणी देत असलेल्या प्रोत्साहनाचा मोलाचा वाटा आहे.हा आवर्जून उल्लेख केला.यापुढेही सर्वांच्या सहकार्याने हि यशस्वी घोडदौड सुरूच असेल असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

उपस्थित सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या वतीने नवोदय पात्र चि.हर्षल भालेराव या निळवंडे शाळेतील विद्यार्थ्यांने आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीक स्वरूपात वेशभूषा स्पर्धेचे प्रात्यक्षिक सादर केले.

कार्यक्रमासाठी अध्यक्षपदाची सूचना शिक्षण विस्तार अधिकारी मंदाताई दुर्गुडे यांनी मांडली. तर तिला अनुमोदन केंद्रप्रमुख अशोक गोसावी यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ घुले व अक्षय खतोडे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपेश वालझाडे,भास्कर हासे,दिपाली रेपाळ,नीता सावंत,अनिता नेहे,स्वाती भोर,सुनील ढेरंगे, दिगंबर फटांगरे, पोपट काळे,संजय लिमकर,सोमनाथ पोंदे, किरण कटके, बाळासाहेब गुंजाळ, शिवाजी आव्हाड,अशोक शेटे आदी शिक्षक तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग व अपंग समावेशित विभाग यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी दिपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख अशोक गोसावी, दशरथ धादवड, यशवंत आंबेडकर, अलका साखरे, प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालिका सरस्वती घुले,छायाचित्रकार सतिष खताळ मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष गोरक्ष नेहे (पुढारी), वासिम शेख (प्रवरातीर) नितीन कोकणे (सी न्यूज) मान्यवर उपस्थित होते.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ट्राफी सौजन्य काजळे ज्वेलर्सचे राजेंद्र काजळे यांच्याकडून तर सर्टिफिकेट शिक्षक बँकेचे संचालक भाऊराव राहिंज व संचालिका सरस्वती घुले यांच्याकडून मिळाले.

आज गटविकास अधिकारी अनिल नागणे यांचा वाढदिवस असल्याने व्यासपीठावर केक कापून त्यांचा  वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post